U-19 WC IND vs BAN: फलंदाजांच्या मनात मनात धडकी भरवणारा कोण आहे रवी कुमार, पाहा बोल्डचा व्हिडिओ

https://maharashtratimes.com
 
U-19 WC IND vs BAN: फलंदाजांच्या मनात मनात धडकी भरवणारा कोण आहे रवी कुमार, पाहा बोल्डचा व्हिडिओ
Jan 30th 2022, 06:36

गयाना: वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या आयसीसी स्पर्धेच्या क्वॉर्टर-फायनलमध्ये बांगलादेशविरुद्ध भारताने शानदार विजय मिळवला आणि सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला भारताने फक्त १११ धावात गुंडाळले. या सामन्यात भारताच्या रवी कुमारने संघाला सुरेख सुरुवात करून दिली. त्याने ३ विकेट घेत बांगलादेशची आघाडीची फळी मोडीत काढली. वाचा- भारताच्या रवी कुमारने महफिजुल इस्लाम, इफ्तिखार हुसैन आणि प्रंतीक नाबिल यांना बाद केले. रवीच्या वेग आणि स्विंगपुढे बांगलादेशच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. रवीने देखील खेळपट्टीचा भरपूर फायदा उठवला. त्याची ही कामगिरी पाहिल्यानंतर भविष्यात तो इंडियामध्ये दिसला नाही तरच नवल. बांगलादेशविरुद्ध रवीने ज्या अप्रतिम चेंडूवर महफिजुलची बोल्ड काढली त्याचे कौतुक संपूर्ण क्रिकेट विश्वात होत आहे. वाचा- रवी कुमारने ओव्हर द विकेट टाकलेला चेंडू फलंदाजाला चकवा देत ऑफ स्टंपला जाऊन लागला. फलंदाज तर सोडाच पण काही क्षणांसाठी रवी कुमारला देखील विश्वास बसला नाही. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विकेट घेत रवी कुमारने बांगलादेशला पहिला धक्का दिला आणि त्यानंतर टीम इंडियाने सामन्यावरील पकड कमी होऊ दिली नाही. त्यानंतर फिरकीपटू विक्की ओस्तवालने कमाल केली. त्याने दोन विकेट घेतल्या. या सामन्यात भारताचा कर्णधार यश ढुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ३७.१ षटकात बांगलादेशचा १११ धावात ऑलआउट केला आणि विजयाचे लक्ष्य ३०.५ षटकात ५ विकेटच्या बदल्यात पार केले. सेमीफायनलमध्ये आता भारताची लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. ही लढत दोन फेब्रुवारी रोजी होईल. पहील सेमीफायनल इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघात १ फेब्रुवारी रोजी होईल. तर फायनल मॅच ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

You are receiving this email because you subscribed to this feed at blogtrottr.com.

If you no longer wish to receive these emails, you can unsubscribe from this feed, or manage all your subscriptions.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form