Earthquake During U19 WC Match: Live सामना सुरू असताना आला भूकंप, पाहा खेळाडूंनी काय केले

https://maharashtratimes.com
 
Earthquake During U19 WC Match: Live सामना सुरू असताना आला भूकंप, पाहा खेळाडूंनी काय केले
Jan 30th 2022, 08:05

पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद): स्पर्धेत अशी एक घटना घडली ज्याचा कोणी विचार देखील केला नव्हता. पोर्ट ऑफ स्पेन येथे झिम्बाब्वे आणि आयरर्लंड याच्यात लढत सुरू होती. सामना सुरू असताना अचानक भूकंप झाला. प्रथम कॅमेरा हळूवार हलला पण त्यानंतर तो वेगाने हलला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- झिम्बाब्वेची फलंदाजी सुरू असताना आठव्या षटकात भूकंपाचे धक्के जाणवले. जवळपास २० सेकंदापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. समालोचकांना देखील हे धक्के जाणवले त्यांनी लाईव्ह कॉमेंट्रीमध्ये याचा उल्लेख केला. यामुळे कोणत्याही पद्धतीचे नुकसान झाले नाही आणि मैदानावरील खेळ देखील थांबवावा लागला नाही. वाचा- आयरर्लंडचा फिरकीपटू मॅथ्यू हम्फ्रीज आठव्या षटकात गोलंदाजी करत होता. त्याने पाचवा चेंडू ब्रायन बेनेटला टाकला तेव्हा समोरचा लाईव्ह कॅमेरा हलला. समालोचक एंडू लियोनार्ड यांनी भूकंपाचे धक्के बसल्यानंतर म्हणाले की, मला विश्वास होत नाही की आता येथे भूकंप झाला. संपूर्ण क्वीन्स पार्क ओव्हल मीडिया सेंटर भूकंपामुळे हलले. अर्थात गंमतीचा भाग म्हणजे याचा काही फार परिणाम झाला नाही क्रिकेटवर जेव्हा भूकंपाचे धक्के बसले तेव्हा एक चेंडू टाकून झाला होता. या सामन्यात झिम्बाब्वेने ४८.४ षटकात सर्वबाद १६६ धावा केल्या. उत्तरादाखल आयरर्लंडने ३२ षटकात २ विकेटच्या बदल्यात १६९ धावा केल्या.

You are receiving this email because you subscribed to this feed at blogtrottr.com.

If you no longer wish to receive these emails, you can unsubscribe from this feed, or manage all your subscriptions.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form